लाडकी बहिण योजनेची लाभार्थी यादी अशी करा डाउनलोड Ladki bahin labharthi list download

Ladki bahin labharthi list download : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची लाभार्थी याद्या आता अपलोड होऊ लागल्या आहेत. जर तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केला असेल, तर तुमचा अर्ज मंजूर झाला आहे की नाही, हे तपासण्याची वेळ आली आहे.

लाडकी बहिण योजनेची लाभार्थी यादी डाउनलोड करा

लाडकी बहिण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केलेल्या महिलांना यादीमध्ये त्यांचे नाव आहे की नाही, हे तपासणे गरजेचे आहे. शिवाय, नारी शक्ती दूत ॲपवर अर्जाची सद्यस्थिती कशी तपासावी, याची सखोल माहिती येथे दिली जाईल.

नारी शक्ती दूत ॲपमध्ये अर्जाची सद्यस्थिती तपासा

अनेक महिलांनी मोबाईलद्वारे लाडकी बहिण योजनेचे ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत. तरीसुद्धा, काही महिलांच्या अर्जाच्या समोर ‘पेंडिंग’ असे स्टेट्स दिसत आहे. ज्या महिलांनी अचूक अर्ज सादर केले होते, त्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर मंजुरीचे संदेश आले आहेत. तसेच, नारी शक्ती दूत ॲपमध्ये त्यांच्या अर्जाच्या स्टेट्स समोर हिरवी पट्टी दिसत असल्याने अर्ज मंजूर झाल्याचे दर्शवले आहे.

ऑफलाईन अर्जाची स्थिती तपासण्याची प्रक्रिया

ज्यांनी लाडकी बहिण योजनेचा अर्ज ऑफलाईन सादर केला आहे, त्यांच्या याद्या ऑनलाईन पोर्टलवर लवकरच उपलब्ध होतील. तसेच, गावातील ग्रामपंचायत कार्यालयात देखील या याद्या तपासता येतील.

अर्ज तपासणी आणि कागदपत्रांचे महत्व

नारी शक्ती दूत ॲपमध्ये जर तुमचा अर्ज अजूनही ‘Pending’ दिसत असेल किंवा नामंजूर झाला असेल, तर अर्ज सादर करताना दिलेल्या माहितीत त्रुटी आहेत का, हे तपासावे. तसेच, कागदपत्रे कशी अपलोड केली आहेत, याचीही शहानिशा करावी.

लाडकी बहिण योजनेची यादी डाउनलोड करण्याची पद्धत

तुमच्या जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईटवर लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी याद्या आता अपलोड होण्यास सुरुवात झाली आहे. यादीमध्ये तुमचे नाव असल्यास, योजनेचा लाभ घ्यावा आणि पुढील पायऱ्यांची योग्य प्रकारे अंमलबजावणी करावी.

2 thoughts on “लाडकी बहिण योजनेची लाभार्थी यादी अशी करा डाउनलोड Ladki bahin labharthi list download”

Leave a Comment