तुमचे नाव पीएम किसान योजनेच्या यादीतून गायब झाले असेल तर लगेच करा हे काम | Beneficiary Status

Beneficiary Status : शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सतराव्या हप्त्याचे वितरण लवकरच होणार आहे. मात्र, त्यापूर्वी लाभार्थी शेतकऱ्यांची यादी तपासणे अत्यावश्यक आहे. यादीत आपले नाव आहे का नाही हे कसे तपासावे, हे येथे सविस्तर सांगितले आहे.

पी एम किसान योजनेतून नाव काढले जाण्याची कारणे

  • बँक खात्याशी संबंधित चुकीची माहिती
  • चुकीचा बँक खात्याचा क्रमांक
  • योजनांच्या निकषांमध्ये अपात्रता
  • अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असल्यास
  • इ केवायसी प्रक्रियेचे अपूर्णत्व

लाभार्थी यादीत नाव कसे तपासावे?

  • सर्वप्रथम, प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेच्या अधिकृत पोर्टलवर (pmkisan.gov.in) लॉग इन करा.
  • पोर्टलवर उजव्या बाजूला “Farmers Corner” हा पर्याय निवडा.
  • “Beneficiary Status” हा पर्याय निवडून, आधार क्रमांक किंवा बँक खात्याचा तपशील प्रविष्ट करा.
  • “Know your Status” पर्याय निवडून, रजिस्ट्रेशन नंबर टाकून स्टेटस तपासा. रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर मोबाईल क्रमांक प्रविष्ट करा, व ओटीपीद्वारे रजिस्ट्रेशन क्रमांक मिळवा.
  • यानंतर, “Beneficiary List” पर्याय निवडून राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडा. “Get Report” वर क्लिक केल्यावर संपूर्ण गावातील लाभार्थी यादी दिसेल. त्या यादीत आपले नाव शोधा.

Leave a Comment